मुख्य मजकुरावर जा
अनुवाद १८:१-५

अनुवाद १८:१-५

लेवी याजकांना—अर्थात् संपूर्ण लेवी गोत्राला—इतर गोत्रांप्रमाणे इस्राएलात वाटा किंवा वतन नाही. ते याहवेहला केलेल्या होमार्पणावर जगतील, कारण हेच त्यांचे वतन आहे.
त्यांच्या इस्राएली भाऊबंदांप्रमाणे त्यांना वतन नसेल; कारण याहवेहच त्यांचे वतन आहेत, जसे त्यांनी त्यांना अभिवचन दिले होते.
बैलाचे किंवा मेंढराचे अर्पण करणार्‍या लोकांकडून मिळणारा याजकांचा हा वाटा आहे: खांदा, अंतर्गत अवयव आणि डोक्याचे मांस.
याशिवाय धान्य, नवा द्राक्षारस व जैतुनाचे तेल यांच्या उत्पन्नाचे प्रथम भाग आणि मेंढरांची प्रथम कातरलेली लोकर त्यांना दिली जावी,
कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना आणि त्यांच्या वंशजांना सर्व गोत्रातून पिढ्यान् पिढ्या निरंतर उभे राहून आणि याहवेहच्या नावाची सेवा करण्यासाठी निवडले आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options