Skip to content
अनुवाद १८:९-१४

परराष्ट्रीय प्रथांची मनाई

अनुवाद १८:९-१४
जेव्हा तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात याल, तेव्हा त्या देशात राहणार्‍या राष्ट्रांच्या अमंगळ चालीरीती शिकू नका.
१०
तुमच्यामध्ये आपल्या पुत्राचा किंवा कन्येचा होम करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा किंवा चेटके करणारा, दुष्ट आत्म्यांची मदत घेऊन भविष्य सांगणारा, जादूटोणा करणारा,
११
अथवा वशीकरण करणारा, अथवा कोणी मध्यस्थ अथवा मृतात्म्यांना बोलावून त्यांच्याशी मसलत करणारा असू नये.
१२
जो कोणी अशी कृत्ये करतो त्याचा याहवेहला तिरस्कार आहे; आणि त्यांच्या या अमंगळ कृत्यांमुळेच त्या राष्ट्रांना याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्यापुढून घालवून देणार आहेत.
१३
तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे निर्दोषपणे चालावे.
१४
जी सर्व राष्ट्रे शकुनमुहूर्त पाहणार्‍यांचे व दैवज्ञांची भाकिते ऐकतात त्या राष्ट्रांचा ताबा तुम्ही घेणार आहात, त्यामधून त्यांना हुसकावून लावा. परंतु याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला अशा गोष्टी करण्याची परवानगी देत नाहीत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options