मोशेसारख्या संदेष्ट्याचे वचन
१५
याहवेह तुमचे परमेश्वर इस्राएलातून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील. तुम्ही त्याचे ऐकावे.
१६
कारण होरेबाच्या पर्वताजवळ हीच विनंती तुम्ही स्वतः याहवेह तुमच्या परमेश्वराजवळ केली होती, जेव्हा तुम्ही विनविले, “याहवेह आमच्या परमेश्वराचा भयावह आवाज पुन्हा ऐकण्याचा अथवा त्या पर्वतावर तो भयावह अग्नी पुनरपि पाहण्याचा प्रसंग आम्हावर येऊ नये, नाहीतर आम्हाला मृत्यू येईल.”
१७
तेव्हा याहवेह मला म्हणाले: “ते जे म्हणतात ते योग्य आहे.
१८
त्यांच्या भाऊबंदांतून मी त्यांच्यासाठी तुझ्यासारखा एक संदेष्टा उभा करेन आणि मी माझी वचने त्याच्या मुखात घालेन. मी त्याला ज्याकाही आज्ञा देईन त्या सर्व तो त्यांना सांगेल.
१९
तो संदेष्टा जे काही माझ्या नावाने बोलेल आणि जो कोणी माझे शब्द ऐकणार नाही, त्याची मी स्वतः झडती घेईन.
२०
पण जो संदेष्टा माझ्या नावाने असे काही बोलतो ज्याची मी आज्ञा दिली नाही किंवा जो संदेष्टा इतर दैवतांच्या नावाने बोलतो त्याला जिवे मारावे.”
२१
तुम्ही स्वतःशी म्हणू शकता, “हा संदेश याहवेह बोलले नाहीत, हे आम्ही कसे ओळखावे?”
२२
तर एखाद्या संदेष्ट्याने याहवेहच्या नावाने ज्या गोष्टीची घोषणा केलेली असेल, ती गोष्ट जर घडून आली नाही किंवा खरेच तसे होत नसेल तर तो संदेश याहवेहने दिलेला नाही. तो संदेष्टा उन्मत्तपणे बोलला आहे, तुम्ही त्याचे भय बाळगू नये.
Settings