Skip to content
दानीएल ८:२७

दानीएलाची प्रतिक्रिया आणि निष्कर्ष

दानीएल ८:२७
आजूबाजूच्या संदर्भासह वचन २७ दाखवत आहे.
२४
त्याचे सामर्थ्य मोठे असेल, पण ते त्याचे स्वतःचे नसेल. तो भयंकर नाश करणार आणि जे काही तो करेल, त्यामध्ये त्याला यश मिळेल. जे बलवान आणि पवित्र आहेत अशा लोकांचा तो नाश करेल.
२५
तो कपटाचा उपयोग समृद्ध होण्यास करेल आणि तो स्वतःला श्रेष्ठ समजेल. जेव्हा त्यांना सुरक्षित वाटेल तेव्हा तो अनेकांचा नाश करेल आणि राजपुत्रांच्या राजपुत्राच्या विरोधात उभा राहील. तरीही तो नष्ट होईल, परंतु मनुष्याच्या सामर्थ्याने नाही.
२६
“संध्याकाळ आणि सकाळचा दृष्टान्त जो तुला देण्यात आला आहे तो खरा आहे, पण हा दृष्टान्त तू गुप्त ठेव. कारण तो येणार्‍या भविष्यकाळाशी संबंधित आहे.”
२७
मग मी दानीएल, बेशुद्ध झालो आणि पुढेही कित्येक दिवस आजारी होतो. पुढे मी उभा झालो आणि राजाचा कारभार पाहू लागलो. परंतु या दृष्टान्तामुळे मी विस्मित झालो, माझे अंतःकरण फार अस्वस्थ झाले; ते समजण्यापलीकडे होते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options