Skip to content
दानीएल ४:२४-२७

दानीएल ४:२४-२७

२४
“महाराज हे आहे याचा अर्थ, आणि महाराज, हा अर्थ आहे आणि परात्पर परमेश्वराने माझ्या स्वामी राजाच्या विरुद्ध काढलेला हा आदेश आहे:
२५
तुम्हाला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तुम्ही वन्यप्राण्यांबरोबर राहाल; तुम्ही बैलाप्रमाणे गवत खाल आणि आकाशाच्या दवाने भिजून जाल. सात कालखंड संपेपर्यंत तुम्ही या स्थितीत राहाल आणि मग तुमचा असा विश्वास असेल की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला ही राज्ये देतात.
२६
परंतु बुंधा व मुळे जमिनीतच ठेवण्याची आज्ञा देण्यात आली आहे, याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही स्वीकाराल स्वर्ग राज्य करते तेव्हा तुमचे राज्य तुम्हाला परत केले जाईल.
२७
म्हणून महाराज, आनंदाने माझा सल्ला स्वीकारा: चांगले ते करून आपली पापे सोडा आणि वाईट सोडून पीडितांवर दया करा. मग तुमची समृद्धी होत राहील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options