Skip to content
दानीएल ११:४०-४५

अंतिम मोहीम

दानीएल ११:४०-४५
४०
“अखेरच्या काळात दक्षिणेचा राजा त्याच्यावर हल्ला करेल आणि उत्तरेचा राजा वादळी झंझावातासारखा रथ, घोडेस्वार आणि पुष्कळ जहाजे घेऊन त्याच्यावर हल्ला करेल. तो अनेक देशांवर स्वार्‍या करेल आणि एखाद्या महापुराप्रमाणे त्यांच्यामधून निघून जाईल.
४१
तो सुंदर देशावर आक्रमण करेल. पुष्कळ देशांची उलथापालथ होईल, पण एदोम, मोआब आणि अम्मोनचे प्रमुख त्याच्या तावडीतून सुटतील.
४२
तो अनेक देशांवर आपल्या शक्तीचा विस्तार करेल; इजिप्त देश देखील सुटणार नाही.
४३
तो इजिप्त देशामधील सोन्याच्या व चांदीच्या खजिन्यांवर व सर्व मौल्यवान वस्तूंवर ताबा मिळवेल, लिबिया व कूशी हे देश त्याचे दास होतील.
४४
परंतु पूर्वेकडून व उत्तरेकडून येणार्‍या बातम्यांनी तो अस्वस्थ होईल आणि मोठ्या क्रोधाने पुष्कळांचा नाश आणि अनेकांना नाहीसे करण्यास बाहेर पडेल.
४५
समुद्राच्या मध्यभागी असलेल्या सुंदर पवित्र पर्वताजवळ तो आपला शाही तंबू उभारेल. तरीही त्याचा अंत होईल आणि त्याच्या साहाय्यासाठी कोणीही नसेल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options