मुख्य मजकुरावर जा
कलस्सैकरांस ४:१५-१८

अंतिम अभिवादन आणि शेवटच्या आज्ञा

कलस्सैकरांस ४:१५-१८
१५
लावदिकीया येथील विश्वासणार्‍या बंधुजनांस, नुंफा व तिच्या घरात जमणार्‍या मंडळीला माझ्या शुभेच्छा सांगा.
१६
तुमच्यासाठी हे पत्र वाचून झाल्यानंतर ते लावदिकीया मंडळीकडेसुद्धा वाचण्यास देणे आणि त्याबदल्यात लावदिकीयाकडून आलेले पत्र वाचावे.
१७
अर्खिप्पाला सांगा, “प्रभूमध्ये तुला जी सेवा दिलेली आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष देणे.”
१८
मी पौल, माझ्या स्वतःच्या हातांनी या शुभेच्छा लिहित आहे. माझ्या बंधनाची आठवण ठेवा. परमेश्वराची कृपा तुम्हाबरोबर असो.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options