आमोस ७:१०-१७
१०
तेव्हा बेथेलचा याजक, अमस्याहने इस्राएलचा राजा यरोबोअमाला हा निरोप पाठविला: आमोस इस्राएलच्या हृदयात तुमच्याविरुद्ध कट रचीत आहे. त्याचेही सर्व शब्द देशासाठी असह्य आहेत.
११
कारण आमोस असे म्हणत आहे: “ ‘यरोबोअम हा तलवारीने मरणार आहे, आणि इस्राएल खात्रीने, आपल्या भूमीवरून दूर बंदिवासात जाईल.’ ”
१२
नंतर अमस्याह आमोसला म्हणाला, “हे संदेष्ट्या, येथून यहूदीया प्रांतात परत जा आणि तिथे जाऊन आपली भाकर कमव आणि तुझे संदेश तिथे सांगत राहा!
१३
याच्यापुढे बेथेल येथे संदेश देऊ नकोस, कारण हे राजकीय भवन आहे आणि राज्याचे मंदिर आहे.”
१४
आमोसने अमस्याहला उत्तर दिले, “मी तर संदेष्टा नाही आणि मी संदेष्ट्याचा पुत्रही नाही, मी तर मेंढपाळ आणि उंबरांच्या झाडांची निगा राखणारा होतो.
१५
परंतु मी गुरांची राखण करीत असताना याहवेहने मला दूर नेले आणि मला म्हणाले, ‘जा, आणि माझ्या इस्राएली लोकांना संदेश सांग.’
१६
म्हणून आता तुम्ही याहवेहचे वचन ऐका, व तुम्ही म्हणतात, “ ‘इस्राएलविरुद्ध भविष्यवाणी करू नकोस, आणि इसहाकाच्या घराण्याविरुद्ध प्रचार करणे थांबव.’
१७
“म्हणून याहवेह असे म्हणतात: “ ‘तुझी पत्नी शहरात वेश्या होईल, तुझे पुत्र व कन्या तलवारीने मरतील, तुझी जमीन मोजण्यात येईल आणि सूत्राने विभागली जाईल, आणि तू स्वत: अपवित्र देशात मरशील. इस्राएलचे लोक निश्चितच आपल्या देशातून दूर बंदिवासात गुलाम म्हणून जातील.’ ”
Settings