Skip to content
आमोस ७:१०-१३

आमोस ७:१०-१३

१०
तेव्हा बेथेलचा याजक, अमस्याहने इस्राएलचा राजा यरोबोअमाला हा निरोप पाठविला: आमोस इस्राएलच्या हृदयात तुमच्याविरुद्ध कट रचीत आहे. त्याचेही सर्व शब्द देशासाठी असह्य आहेत.
११
कारण आमोस असे म्हणत आहे: “ ‘यरोबोअम हा तलवारीने मरणार आहे, आणि इस्राएल खात्रीने, आपल्या भूमीवरून दूर बंदिवासात जाईल.’ ”
१२
नंतर अमस्याह आमोसला म्हणाला, “हे संदेष्ट्या, येथून यहूदीया प्रांतात परत जा आणि तिथे जाऊन आपली भाकर कमव आणि तुझे संदेश तिथे सांगत राहा!
१३
याच्यापुढे बेथेल येथे संदेश देऊ नकोस, कारण हे राजकीय भवन आहे आणि राज्याचे मंदिर आहे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options