आमोस ५:१-३
१
हे इस्राएला, या वचनास ऐक, मी तुझ्याबद्दल विलाप करतो:
२
“इस्राएलची कुमारी पडली आहे, ती पुन्हा कधीही उठणार नाही, तिच्या स्वतःच्या भूमीत उजाड आहे, तिला उठविणारा कोणीही नाही.”
३
कारण सार्वभौम याहवेह इस्राएलास असे म्हणतात: “तुमच्या शहरातून एक हजार शूर निघतात, त्यातील शंभरच उरतील; तुमच्या शहरातून शंभर निघतात, त्यातील दहाच उरतील.”
Settings