Skip to content
आमोस ४:६-१०

आमोस ४:६-१०

६
“मी तुम्हाला प्रत्येक शहरात उपाशी पोटी ठेवले आणि प्रत्येक नगरात भाकरीची कमतरता केली, तरीही तुम्ही मजकडे वळला नाही.” असे याहवेह जाहीर करतात.
७
“हंगामाच्या आधी तीन महिने मी पाऊस रोखून धरला. मी एका नगरावर पाऊस पाडला, पण दुसर्‍यावर पाडला नाही. एका शेतावर पाऊस पडला; दुसर्‍या शेतावर पाऊस नव्हता आणि ते सुकून गेले.
८
पाण्यासाठी लोक नगरोनगरी भटकले परंतु त्यांना पिण्यास पुरेसे मिळाले नाही, तरीही तुम्ही मजकडे वळला नाही.” असे याहवेह जाहीर करतात.
९
“मी तुमच्या शेतांवर व द्राक्षमळ्यांवर तांबेरा आणि भेरड हे रोग पाठविले; टोळांनी तुमची अंजिराची व जैतुनाची झाडे खाऊन टाकली, आणि तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
१०
“इजिप्तमध्ये पाठविल्या तशा पीडा मी तुमच्यामध्ये पाठविल्या. मी तुमच्या तरुणांना तुमच्या लुटलेल्या घोड्यांसहित तलवारीने मारून टाकले. तुमच्या छावणीतील दुर्गंध तुमच्या नाकात भरला, तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” असे याहवेह जाहीर करतात.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options