२४
तेव्हा शिमोन म्हणाला, “तुम्ही सांगितलेल्या या गोष्टी मजवर येऊ नयेत, यासाठी प्रभूला विनवणी करा.”
२५
आणखी प्रभूचे वचन गाजवून व येशूंबद्दल साक्ष देऊन पेत्र व योहान यरुशलेमला परतले. परत जाताना रस्त्याने शोमरोनातील अनेक खेड्यांमध्ये थांबून त्यांनी तेथील लोकांना शुभवार्ता सांगितली.