फेस्तुस व अग्रिप्पाचा प्रतिसाद
२४
हे ऐकताच फेस्त मध्येच म्हणाला, “पौला, तुझे मन ठिकाण्यावर नाही. तुझ्या दीर्घकाळाच्या अभ्यासाने तुझे मन भ्रमिष्ट झाले आहे.”
२५
परंतु पौलाने उत्तर केले, “अत्यंत थोर फेस्त महाराज, मी वेडा नाही, मी सत्य व वैचारिकदृष्ट्या योग्य तेच सांगत आहे.
२६
महाराजांना या गोष्टी माहीत आहेत आणि या गोष्टी मोकळेपणाने मी तुमच्याबरोबर बोलू शकतो. कारण माझी खात्री आहे की या सर्व घटना आपल्या परिचयाच्या आहेत, कारण या गोष्टी कुठे जगाच्या कानाकोपर्यात घडलेल्या नाहीत.
२७
अग्रिप्पा महाराज, संदेष्ट्यांवर आपला विश्वास आहे ना? आपण विश्वास ठेवता हे मला माहीत आहे.”
२८
अग्रिप्पा मध्येच पौलास म्हणाला, “एवढ्या थोड्या वेळात माझे मन वळवून मला ख्रिस्ती करता येईल असे तुला वाटते का?”
२९
पौलाने उत्तर दिले, “पुष्कळ अथवा थोड्या वेळात—परंतु मी परमेश्वराजवळ अशी प्रार्थना करतो की आज माझे बोलणे जे सर्वजण ऐकत आहेत व आपण सुद्धा या बेड्यांशिवाय माझ्यासारखे व्हावे.”
Settings