Skip to content
प्रेषित २५:६-१२

फेस्तुससमोर पौलाची चौकशी

प्रेषित २५:६-१२
त्यानंतर आठ किंवा दहा दिवस त्यांच्याबरोबर घालविल्यानंतर, फेस्त कैसरीयास खाली गेला. दुसर्‍याच दिवशी न्यायालय भरवून पौलाला आपल्यासमोर आणावे असा त्याने हुकूम दिला.
पौल आत आल्यावर, यरुशलेमहून आलेले यहूदी लोक त्याच्याभोवती उभे राहिले. त्यांनी त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर असे आरोप लावले, परंतु ते आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत.
पौलाने त्याच्या बचावासाठी उत्तर दिले, “मी यहूदी लोकांच्या नियमशास्त्राविरुद्ध, मंदिराविरुद्ध किंवा कैसराविरुद्ध चुकीचे असे काहीही केलेले नाही.”
तेव्हा यहूदी लोकांना प्रसन्न करण्यास आतुर असलेल्या फेस्ताने पौलाला विचारले, “यरुशलेमला जाऊन तिथे माझ्यापुढे तुझी चौकशी व्हावी, यासाठी तू तयार आहेस काय?”
१०
परंतु पौलाने त्याला उत्तर दिले: “मी कैसराच्या न्यायालयापुढे उभा आहे म्हणून इथेच माझा न्याय होईल. तुम्हाला चांगले ठाऊक आहे की, मी यहूदीयांच्या विरुद्ध काहीही उपद्रव केले नाही.
११
जर मी मृत्यूस पात्र असे काही केले असेल, तर मी मरण्यास नकार देत नाही परंतु यहूदी माझ्यावर जे आरोप करतात, ते जर खरे नाहीत, तर कोणालाही मला यांच्या स्वाधीन करण्याचा अधिकार नाही. मी कैसराजवळ न्याय मागतो!”
१२
त्यावर फेस्ताने आपल्या सल्लागारांची मसलत घेऊन जाहीर केले, “ठीक आहे. तू कैसराजवळ न्यायाची याचना केली आहेस, तर तू कैसरापुढेच जाशील!”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options