Skip to content
प्रेषित २५:१-५

फेस्तुस पदभार स्वीकारतो व यहुदी पुढाऱ्यांना भेटतो

प्रेषित २५:१-५
१
तीन दिवसानंतर प्रांतात आल्यानंतर, फेस्त कैसरीयाहून यरुशलेम येथे वर गेला,
२
तेव्हा प्रमुख याजकांनी आणि यहूदी पुढार्‍यांनी त्याच्यासमोर पौलाविरुद्ध दोषपत्रे सादर केली.
३
त्यांनी फेस्ताला विनंती केली की, पौलाची बदली यरुशलेमकडे करावी आणि आम्हावर कृपादृष्टी दाखवावी, कारण पौलाला घेऊन जाताना वाटेत अचानक त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार मारण्याची योजना ते करीत होते.
४
परंतु फेस्ताने त्यांना उत्तर दिले, “पौल कैसरीया येथे कैदेत आहे व मी लवकरच स्वतः तिथे जाणार आहे.
५
तुमच्या काही पुढार्‍यांनी माझ्याबरोबर यावे आणि या मनुष्याने काही गुन्हा केला असेल तर त्यांनी त्याच्याविरुद्ध तसे आरोप तिथे सादर करावेत.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options