Skip to content
प्रेषित २१:८-१४

कैसरीयात पौल: फिलिप्पाची भेट

प्रेषित २१:८-१४
दुसर्‍या दिवशी आम्ही निघालो व कैसरीया येथे पोहोचलो आणि सुवार्तिक फिलिप्पाच्या घरी राहिलो, तो सात जणांपैकी एक होता.
त्याला चार अविवाहित कन्या होत्या, त्या भविष्यवाणी करीत असत.
१०
आम्ही अनेक दिवस तिथे राहिल्यानंतर, एक अगब नावाचा संदेष्टा यहूदीया येथून तिथे आला.
११
आम्हाकडे येऊन त्याने पौलाचा कमरबंद घेतला व स्वतःचे हातपाय बांधून तो म्हणाला, “पवित्र आत्मा म्हणतो, ‘हा कमरबंद ज्या मनुष्याचा आहे त्याला यरुशलेममधील यहूदी पुढारी असेच बांधून गैरयहूदीयांच्या हाती देतील.’ ”
१२
हे ऐकल्यानंतर आम्ही आणि लोकांनी पौलाला यरुशलेमला न जाण्याची विनंती केली.
१३
पौल म्हणाला, “तुम्ही रडून माझे हृदय का तोडता? यरुशलेममध्ये केवळ तुरुंगात पडण्याचीच माझी तयारी नाही, तर प्रभू येशूंच्या नावासाठी मरण्यास देखील मी तयार आहे.”
१४
त्याचे मन वळत नाही हे पाहून आम्ही म्हणालो, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options