Skip to content
प्रेषित २१:३२-३५

प्रेषित २१:३२-३५

३२
तेव्हा तो त्वरित आपल्या सैनिकांना व अधिकार्‍यांना घेऊन धावत समुदायाकडे गेला. मारणार्‍यांनी सेनापतीला व फौजेला येताना पाहिल्याबरोबर पौलाला फटके मारण्याचे थांबविले.
३३
सेनापतीने येऊन त्याला अटक केली आणि दोन साखळ्यांनी त्याला बांधण्यात यावे अशी आज्ञा केली. नंतर त्याने तो कोण होता आणि त्याने काय केले होते याची चौकशी केली.
३४
तेव्हा समुदायातील काही लोक एक आणि इतर दुसरे काहीतरी म्हणत होते. या गलबल्यामुळे सेनापतीला खरे ते काही कळेना, म्हणून त्याने पौलाला बराकीत नेण्याचा हुकूम दिला.
३५
पौल पायर्‍यांपर्यंत पोहोचला, त्यावेळी लोकांची हिंसा एवढी वाढली की होती की सैनिकांना त्याला उचलून न्यावे लागले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options