प्रेषित १९:१९-२०
१९
अनेक लोक जे जादूटोणा करीत होते, त्यांनी त्यांची पुस्तके एकत्रित आणली आणि ती सर्व लोकांसमोर जाळून टाकली. त्यांनी त्या पुस्तकांची किंमत मोजली, तेव्हा ती पन्नास हजार चांदीची नाणी एवढी झाली.
२०
या रीतीने प्रभूचे वचन वाढत जाऊन प्रबळ झाले.