Skip to content
प्रेषित १२:६-११

प्रेषित १२:६-११

हेरोद त्याला चौकशीसाठी बाहेर आणणार होता त्या आधीच्या रात्री, पेत्र दोन बेड्या घातलेला, दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता आणि पहारेकरी प्रवेशद्वारापुढे रक्षण करीत उभे होते.
तेव्हा अकस्मात तुरुंगाच्या कोठडीत प्रकाश पडला आणि पाहा, प्रभूचा दूत पेत्राजवळ प्रकट झाला. त्या दूताने पेत्रावर हात ठेऊन त्याला जागे केले व म्हटले, “लवकर, ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील बेड्या गळून पडल्या.
मग देवदूताने त्याला सांगितले, “कपडे घाल आणि पायात जोडे घाल.” तेव्हा पेत्राने त्याप्रमाणे केले. मग देवदूताने त्याला आज्ञा केली, “आता तुझा अंगरखा लपेट आणि माझ्यामागे ये.”
पेत्र तुरुंगातून निघून त्याच्यामागे चालू लागला, परंतु देवदूत जे करीत होता ते सर्व खरोखर घडत होते याची त्याला कल्पना नव्हती; तो एक दृष्टान्त पाहत आहे असे त्याला वाटले.
१०
त्यांनी पहिल्या व दुसर्‍या पहारेकर्‍यांना ओलांडले आणि ते शहरात जाण्याच्या लोखंडी द्वारापर्यंत पोहोचले. त्यावेळी तो दरवाजा त्यांच्यासाठी आपोआपच उघडला गेला आणि त्यातून ते बाहेर पडले. जेव्हा पुढे एका रस्त्याइतके अंतर चालून गेल्यानंतर अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला.
११
पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला निश्चित कळून आले की प्रभूने त्यांचा देवदूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहूदी लोक ज्या गोष्टींची अपेक्षा करीत होते त्यापासून मला सोडविले आहे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options