Skip to content
प्रेषित १:२०-२६

प्रेषित १:२०-२६

२०
“यासाठी,” पेत्र म्हणाला, “स्तोत्रांच्या पुस्तकात लिहिले आहे: “ ‘त्याचे ठिकाण ओसाड पडो; व त्यात कोणीही वस्ती न करो,’ आणि, “ ‘त्याचा अधिकार घेण्यासाठी इतर येवोत.’
२१
यास्तव हे आवश्यक आहे की अशा व्यक्तींपैकी एकाची निवड आपण करावी की, जो प्रभू येशू आपल्यामध्ये राहत होते त्या वेळेपासून आतापर्यंत सर्व वेळ आपल्याबरोबर राहात आलेला आहे,
२२
प्रारंभीपासून म्हणजे योहानाकडून येशूंचा बाप्तिस्मा झाला, त्या दिवसापासून येशूंना स्वर्गात घेतले जाईपर्यंत, कारण यांच्यामधून एकाने आपल्याबरोबर येशूंच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार असणे आवश्यक आहे.”
२३
तेव्हा त्यांनी यूस्त म्हटलेला योसेफ, ज्याला बारसब्बास देखील म्हणत असत आणि मत्थिया अशा दोन माणसांची नावे सुचविली.
२४
नंतर त्यांनी प्रार्थना केली, “हे प्रभू, तुम्ही प्रत्येकाचे अंतःकरण जाणता. या दोघांपैकी तुम्ही कोणाला निवडले आहे हे आम्हाला दाखवा,
२५
ही प्रेषितीय सेवा, नियोजित स्थानी गेलेल्या यहूदाहने सोडली.”
२६
नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि मत्थियाची चिठ्ठी निघाली; व इतर अकरा प्रेषितांबरोबर त्याची निवड झाली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options