Skip to content
2 शमुवेल २२:२७-३१

2 शमुवेल २२:२७-३१

२७
शुद्धजनांशी तुम्ही शुद्धतेने वागता, परंतु कुटिलांशी तुम्ही चतुरतेने वागता.
२८
नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता, परंतु उन्मत्त लोकांवर नजर ठेवून तुम्ही त्यांचा अधःपात करतात.
२९
हे याहवेह, तुम्ही माझे दीप आहात; याहवेह माझ्या अंधाराचा प्रकाश करतात.
३०
तुमच्याच साहाय्याने मी सैन्यावर मात करू शकतो; माझ्या परमेश्वरामुळे मी गड चढू शकतो.
३१
“परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे. याहवेहचे वचन दोषरहित आहे; जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options