2 शमुवेल १७:१५-१६
१५
हूशाईने सादोक आणि अबीयाथार याजकांना सांगितले, “अहीथोफेलने अबशालोम आणि इस्राएलच्या वडीलजनास अमुक करण्याचा सल्ला दिला होता, परंतु मी त्यांना असे करण्याचा सल्ला दिला आहे.
१६
आता लवकर निरोप पाठवा आणि दावीदाला सांगा, ‘आजची रात्र रानाच्या उतारावर घालवू नको; तर लवकर पलीकडे जा, नाहीतर राजा आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व लोक नष्ट केले जातील.’ ”
Settings