Skip to content
2 शमुवेल १६:१-३

2 शमुवेल १६:१-३

जेव्हा दावीद डोंगराच्या माथ्यावर काही अंतरावर गेला, तिथे मेफीबोशेथचा कारभारी सीबा त्याला भेटण्यासाठी तिथे वाट पाहत होता. त्याच्याकडे खोगीर घातलेली गाढवे व त्यांच्यावर दोनशे भाकरी, मनुक्यांच्या शंभर ढेपा, अंजिराच्या शंभर ढेपा आणि द्राक्षारसाचा एक बुधला होता.
राजाने सीबाला विचारले, “हे तू का आणले आहेस?” सीबाने उत्तर दिले, “गाढवे राजघराण्यातील लोकांना बसण्यासाठी, भाकरी आणि फळे लोकांना खाण्यासाठी आणि हा द्राक्षारस रानातून जाताना जे कोणी थकून जातात त्यांना ताजेतवाने करण्यासाठी.”
तेव्हा राजाने विचारले, “तुझ्या धन्याचा नातू कुठे आहे?” सीबा त्याला म्हणाला, “तो यरुशलेमात राहत आहे, कारण त्याला असे वाटते, ‘इस्राएलचे लोक मला माझ्या आजोबांचे राज्य आज परत मिळवून देतील.’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options