2 शमुवेल १३:१५-१७
१५
नंतर अम्नोनाला तिचा तीव्र तिरस्कार वाटू लागला. वास्तविकता त्याने तिच्यावर जितके प्रेम केले होते, त्यापेक्षाही त्याला अधिक तिचा तिरस्कार वाटला. नंतर अम्नोन तिला म्हणाला, “ऊठ आणि चालती हो!”
१६
“नाही!” ती त्याला म्हणाली, “तू मला पाठवून देणे हे, जे वाईट कृत्य तू आधी केले आहे त्यापेक्षाही भयंकर आहे.” परंतु तो तिचे ऐकेना.
१७
त्याने त्याच्या खासगी सेवकाला बोलावून सांगितले, “या स्त्रीला माझ्या नजरेपासून बाहेर काढ आणि तिच्यामागे दाराला कडी लाव.”
Settings