Skip to content
2 शमुवेल ११:१४-२७

2 शमुवेल ११:१४-२७

१४
सकाळी दावीदाने योआबाला एक पत्र लिहिले आणि ते उरीयाहच्या हाती पाठवले.
१५
त्यात त्याने असे लिहिले, “तुंबळ युद्धाच्या तोंडी उरीयाहला ठेवा; आणि त्याच्यापासून मागे या म्हणजे त्याच्यावर वार होईल व तो मरण पावेल.”
१६
म्हणून जिथे योआबने शहराला वेढा घातला होता, तेव्हा त्याला माहीत होते की, शूर योद्धे कुठे असतील तिथे त्याने उरीयाहला ठेवले.
१७
जेव्हा त्या शहराची माणसे बाहेर आली आणि त्यांनी योआबाविरुद्ध लढाई केली, तेव्हा दावीदाच्या सैन्यातील काही माणसे युद्धात पडली; व उरीयाह हिथी सुद्धा मारला गेला.
१८
योआबने दावीदाकडे लढाईचा संपूर्ण वृतांत पाठवला.
१९
त्याने संदेशवाहकाला सूचना दिली: “राजाला या लढाईचा वृत्तांत दिल्यानंतर,
२०
राजाचा राग भडकेल आणि ते तुला विचारतील, ‘लढण्यासाठी तुम्ही त्या शहराच्या इतक्या जवळ का गेला? ते नगराच्या तटावरून बाण सोडतील याची कल्पना तुम्हाला नव्हती काय?
२१
यरुब्बशेथचा पुत्र अबीमेलेख याला कोणी मारले? एका स्त्रीने जात्याची तळी भिंतीवरून टाकून तेबेस येथे त्याला मारले नाही काय? तुम्ही त्या भिंतीच्या इतक्या जवळ का गेला?’ जर राजा तुला असे विचारतील, तेव्हा त्यांना सांग, ‘तुमचा सेवक उरीयाह हिथी हा सुद्धा मरण पावला आहे.’ ”
२२
त्याप्रमाणे संदेशवाहक निघाला आणि पोहोचल्यानंतर त्याने दावीदाला ते सर्वकाही सांगितले जे सांगण्यासाठी योआबने त्याला पाठवले होते.
२३
संदेशवाहक दावीदाला म्हणाला, “ती माणसे आमच्यावर प्रबळ झाली आणि मोकळ्या मैदानात त्यांनी आमच्यावर हल्ला केला, परंतु आम्ही त्यांना शहराच्या प्रवेशद्वाराकडे परत लावून दिले.
२४
तेव्हा तिरंदाजांनी वेशीच्या तटांवरून तुमच्या सेवकांवर बाणांनी हल्ला केला आणि राजाची काही माणसे मारली गेली. याशिवाय, आपला सेवक उरीयाह हिथी हा सुद्धा मरण पावला आहे.”
२५
दावीदाने त्या संदेशवाहकाला म्हटले, “योआबाला सांग, ‘यामुळे तू निराश होऊ नकोस, कारण तलवार जसे एकाचा तसेच दुसर्‍याचाही नाश करते. त्या नगराविरुद्ध अधिक नेटाने हल्ला करा आणि त्याचा नाश करा.’ योआबाला उत्तेजित करण्यासाठी हे तू त्याला सांग.”
२६
जेव्हा उरीयाहच्या पत्नीने ऐकले की, तिचा पती मारला गेला, तिने त्याच्यासाठी शोक केला.
२७
शोककाळ संपल्यानंतर दावीदाने तिला आपल्या घरी बोलावून घेतले आणि ती त्याची पत्नी झाली आणि तिने त्याच्या पुत्राला जन्म दिला. परंतु दावीदाने जे केले होते त्यामुळे याहवेह असंतुष्ट झाले होते.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options