2 राजे ८:२७-२९
२७
तो अहाबाच्या घराण्याच्या मार्गाने चालला आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, कारण त्याचे अहाबाच्या घराण्याशी विवाहाद्वारे संबंध होते.
२८
अरामचा राजा, हजाएलविरुद्ध रामोथ गिलआद येथे झालेल्या युद्धात अहज्याह इस्राएलचा राजा अहाबाचा पुत्र योरामच्या बाजूने लढला. या युद्धात योराम राजा जखमी झाला;
२९
रामाह येथे अरामचा राजा हजाएलशी लढताना झालेल्या जखमांना मलम पट्टी करण्यासाठी योराम राजा येज्रीलला परतला. यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याह हा अहाबाचा पुत्र योरामची प्रकृती पाहण्यासाठी येज्रीलला गेला, कारण योराम जखमी झाला होता.
Settings