Skip to content
2 राजे ६:१५

2 राजे ६:१५

आजूबाजूच्या संदर्भासह वचन १५ दाखवत आहे.
१२
तेव्हा एका अधिकार्‍याने म्हटले, “माझे स्वामी महाराज, आपल्यापैकी कोणीही नाही, परंतु इस्राएलमधील अलीशा जो संदेष्टा, तो इस्राएलाच्या राजाला तुम्ही तुमच्या विश्रांतिगृहात उच्चारलेले प्रत्येक शब्द कळवितो.”
१३
राजाने आदेश दिला, “तो कुठे आहे शोधून काढा, म्हणजे मी माणसे पाठवितो आणि त्याला कैद करतो.” त्याच्याकडे बातमी परत आली: “तो दोथान येथे आहे.”
१४
मग त्याने तिथे घोडे आणि रथ व एक मोठे सैन्य पाठविले. ते रात्री गेले आणि शहराला वेढा घातला.
१५
दुसर्‍या दिवशी पहाटेच परमेश्वराच्या मनुष्याचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैनिकांनी रथ आणि घोडे यासह शहराला वेढा दिला आहे, हे त्याला दिसले. तेव्हा तो ओरडला, “माझ्या स्वामी, आता आपण काय करावे?”
१६
संदेष्ट्याने उत्तर दिले, “भिऊ नकोस, कारण त्यांच्यासोबत जे आहेत, त्यांच्यापेक्षा जे आपल्यासोबत आहेत ते अधिक आहेत.”
१७
मग अलीशाने ही प्रार्थना केली, “हे याहवेह, याचे डोळे उघडा, म्हणजे तो पाहू शकेल.” तेव्हा याहवेहने त्या सेवकाचे डोळे उघडले, आणि त्याने दृष्टी वर केली आणि पाहिले की, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे आणि रथ यांनी भरलेला आहे.
१८
जेव्हा शत्रू खाली त्याच्याकडे आले, तेव्हा अलीशाने याहवेहकडे प्रार्थना केली, “कृपा करून या सर्व लोकांना आंधळे करून टाका.” अलीशाने विनंती केल्याप्रमाणे त्यांनी त्यांना आंधळे केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options