2 राजे ४:४३-४४
४३
त्याच्या सेवकाने म्हटले, “शंभर लोकांपुढे हे भोजन कसे ठेऊ?” परंतु अलीशाने उत्तर दिले, “हे लोकांना खाण्यास दे. कारण याहवेह असे म्हणतात: ‘ते खातील आणि काही शिल्लक राहील.’ ”
४४
मग त्याने ते त्यांच्यासमोर वाढले, आणि त्यांनी ते खाल्ले आणि याहवेहच्या वचनानुसार काही शिल्लक देखील उरले.