Skip to content
2 राजे ३:१६-२०

2 राजे ३:१६-२०

१६
आणि तो म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: मी या दरीला पाण्याच्या तळ्यांनी भरून टाकीन.
१७
कारण याहवेह असे म्हणतात: तुम्हाला वारा किंवा पाऊस दिसणार नाही, तरीही ही दरी पाण्याने भरून जाईल आणि तुम्ही, तुमचे गुरे आणि इतर जनावरे ते पाणी पितील.
१८
हे तर याहवेहच्या दृष्टीने फार सोपे आहे, ते मोआबी लोकांना देखील तुमच्या हातात देतील.
१९
तुम्ही त्यांची सर्वोत्तम शहरे, तसेच तटबंदी असलेली शहरेही जिंकून घ्याल. प्रत्येक उत्तम झाड तुम्ही कापाल, सर्व झर्‍यांचे पाणी तुम्ही अडवाल आणि दगड पसरून त्यांच्या सुपीक जमिनीची नासाडीही कराल.”
२०
दुसर्‍या दिवशी सकाळी यज्ञार्पणाच्या वेळी—पाण्याचा लोंढा एदोमाच्या दिशेने वाहत आला व संपूर्ण भूमी पाण्याने भरून गेली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options