2 राजे ३:१५-१८
१५
परंतु आता एका वीणावादकाला मजकडे घेऊन या.” हा वादक वीणा वाजवित असताना याहवेहचा हात अलीशावर आला
१६
आणि तो म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: मी या दरीला पाण्याच्या तळ्यांनी भरून टाकीन.
१७
कारण याहवेह असे म्हणतात: तुम्हाला वारा किंवा पाऊस दिसणार नाही, तरीही ही दरी पाण्याने भरून जाईल आणि तुम्ही, तुमचे गुरे आणि इतर जनावरे ते पाणी पितील.
१८
हे तर याहवेहच्या दृष्टीने फार सोपे आहे, ते मोआबी लोकांना देखील तुमच्या हातात देतील.
Settings