Skip to content
2 राजे २३:२४-२८

2 राजे २३:२४-२८

२४
योशीयाहने यहूदीया व यरुशलेममधील प्रेत साधक, भूतविद्या करणारे, कुलदैवते व मूर्ती, आणि सर्वप्रकारच्या घृणास्पद वस्तू काढून टाकल्या. हिल्कियाह याजकाला याहवेहच्या मंदिरात आढळलेल्या नियमांच्या पुस्तकात जे लिहिले होते ते पूर्ण करण्यासाठी त्याने असे केले.
२५
योशीयाह सारखा कोणीही राजा त्याच्या आधी व त्याच्यानंतर झाला नाही ज्याने याहवेहकडे वळून मोशेचे नियमशास्त्र पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्णशक्तीने पाळले.
२६
इतके होऊनही यहूदीयाच्या विरुद्ध आलेला याहवेहचा महाक्रोध कमी झाला नव्हता, मनश्शेह राजाने जी दुष्टता केली होती त्यामुळे त्यांचा यहूदाहवरचा राग कमी झाला नाही.
२७
म्हणून याहवेहने म्हटले, “इस्राएलप्रमाणे मी यहूदीयालाही माझ्या उपस्थितीतून काढून टाकेन आणि मी स्वतः ज्या नगरीला निवडले होते त्या यरुशलेमचा आणि या मंदिराचाही ज्याबद्दल मी म्हटले होते, ‘तिथे माझे नाव राहील’ त्यांचा त्याग करेन.”
२८
योशीयाहच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने जे सर्व केले, ते यहूदीयाच्या राजांचा इतिहासग्रंथामध्ये नमूद केलेले नाही काय?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options