Skip to content
2 राजे १५:२२-२६

2 राजे १५:२२-२६

२२
मनाहेम आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला. आणि त्याच्या जागी त्याचा पुत्र पेकाहियाह हा राज्य करू लागला.
२३
यहूदीयाचा राजा अजर्‍याहाच्या कारकिर्दीच्या पन्नासाव्या वर्षी मनाहेमचा पुत्र पेकाहियाह शोमरोनात इस्राएलवर राज्य करू लागला, त्याने दोन वर्षे राज्य केले.
२४
पेकाहियाहने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली होती, तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.
२५
त्याचा एक मुख्य अधिकारी, रमाल्याहचा पुत्र पेकहने त्याच्याविरुद्ध कट रचला. गिलआदी लोकांपैकी पन्नास लोकांना बरोबर घेऊन त्याने पेकाहियाहला, अर्गोब आणि अरये यांच्यासह शोमरोन येथील राजवाड्याच्या वाड्यात मारले. पेकहने पेकाहियाहयाचा वध केला आणि त्याच्या जागी राजा झाला.
२६
पेकाहियाह राजाच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने जे काही केले ते इस्राएली राजांचा इतिहासाग्रंथात लिहून ठेवलेले नाही काय?
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options