Skip to content
2 राजे १५:१३-१६

शल्लूमची अल्प कारकीर्द

2 राजे १५:१३-१६
१३
यहूदीयाचा राजा उज्जीयाहच्या एकोणचाळिसाव्या वर्षी याबेशाचा पुत्र शल्लूम इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने शोमरोनमध्ये एक महिना राज्य केले.
१४
नंतर गादीचा पुत्र मनाहेम हा तिरजाहवरून शोमरोनास गेला आणि त्याने याबेशाचा पुत्र शल्लूमास ठार मारले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला.
१५
शल्लूम राजाच्या इतर घटना आणि त्याने केलेला कट यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहासग्रंथात केलेली नाही काय?
१६
त्यावेळी, तिरजाहपासून निघालेल्या मनाहेमाने तिफसाह आणि शहरातील आणि सीमेच्या क्षेत्रातील सर्वांवर हल्ला केला, कारण त्यांनी आपली वेस उघडण्यास नकार दिला. त्याने त्यांना मार दिला आणि सर्व गरोदर महिलांना चिरून टाकले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options