Skip to content
2 राजे १०:४-११

2 राजे १०:४-११

परंतु ते घाबरले आणि म्हणाले, “त्याला दोन राजे रोखू शकले नाहीत, तर आम्ही कसे करू शकतो?”
मग राजवाड्याचा कारभारी, शहराचा कारभारी, वडील व त्या पुत्रांचे पालक यांनी येहूला हा निरोप पाठविला: “आम्ही तुमचे सेवक आहोत व तुम्ही जे काही सांगाल ते आम्ही करू. आम्ही कोणालाही राजा म्हणून नियुक्त करणार नाही; तुम्हाला जे उत्तम वाटते, ते तुम्ही करा.”
मग येहूने दुसरे पत्र त्यांना लिहिले आणि त्यात असे लिहिलेले होते, “जर तुम्ही माझ्या बाजूचे असाल आणि माझ्या आज्ञा पाळणार असाल, तर उद्या याच वेळेला तुम्ही तुमच्या धन्याच्या पुत्रांची शिरे घेऊन मजकडे येज्रीलमध्ये या.” आता सत्तर राजपुत्र शहराच्या प्रमुख व्यक्तीबरोबर होते, जे त्यांचे संगोपन करत होते.
जेव्हा त्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी राजपुत्रांना घेतले आणि सर्व सत्तर पुत्रांना ठार केले. त्यांनी त्यांची शिरे टोपल्यांमध्ये भरून ती येहूला येज्रीलमध्ये पाठवून दिली.
जेव्हा दूत त्याच्याकडे आला, त्याने येहूला सांगितले, “त्यांनी राजपुत्रांची शिरे आणली आहेत.” तेव्हा येहूने आदेश दिला, “ती शिरे मुख्य वेशीजवळ, त्यांचे दोन ढीग करून सकाळपर्यंत ठेवावी.”
दुसर्‍या दिवशी सकाळी येहू बाहेर आला. तो सर्व लोकांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्ही सर्व निर्दोष आहात. मी आपल्या धन्याच्या विरुद्ध षडयंत्र केले आणि त्याला ठार मारले, पण या सर्वांना कोणी मारले?
१०
तेव्हा हे जाणून घ्या, अहाबाच्या घराण्याविरुद्ध याहवेहने म्हटलेला एकही शब्द व्यर्थ जाणार नाही. याहवेहने ते पूर्ण केले जे त्यांनी त्यांचा सेवक एलीयाहद्वारे प्रकट केले होते.”
११
असे येहूने येज्रीलमधील अहाबाच्या घराण्यातील सर्वांना, त्याचे मुख्य लोक, त्याचे सर्व जवळचे मित्र आणि त्याच्या याजकांना ठार मारले आणि कोणालाही जिवंत सोडले नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options