Skip to content
2 इतिहास ५:१

2 इतिहास ५:१

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
याहवेहच्या मंदिराचे सर्व काम शलोमोन राजाने पूर्ण केल्यानंतर, त्याने त्याचा पिता दावीदाने समर्पित केलेल्या वस्तू मंदिरात आणल्या; चांदी, सोने आणि इतर सामान—शलोमोनाने त्या वस्तू परमेश्वराच्या मंदिराच्या भांडार्‍यात ठेवल्या.
तेव्हा शलोमोनाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना यरुशलेमास बोलाविले.
आणि इस्राएलचे सर्व लोक सातव्या महिन्यातील सणाच्या काळात राजाकडे एकत्र आले.
जेव्हा इस्राएलचे सर्व वडीलजन आले तेव्हा लेवी लोकांनी कोश उचलून घेतला,
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options