2 इतिहास ३२:२१-२३
२१
आणि याहवेह यांनी एक देवदूत पाठवला, त्याने अश्शूरच्या राजाच्या छावणीतील सर्व लढवय्ये, सेनापती आणि अधिकारी यांचा नाश केला. त्यामुळे तो अपमानित होऊन स्वतःच्या भूमीकडे मागे फिरला. आणि जेव्हा तो त्याच्या दैवताच्या मंदिरात गेला तेव्हा त्याच्या काही मुलांनी, जे त्याचे स्वतःचे रक्त आणि मांस होते, त्यांनी त्याला तलवारीने कापले.
२२
अशाप्रकारे याहवेहनी हिज्कीयाह आणि यरुशलेमच्या लोकांना अश्शूरचा राजा सन्हेरीबच्या हातातून आणि इतर सर्वांच्या हातातून वाचविले. त्यांनी सर्वप्रकारे त्यांची काळजी घेऊन त्यांना विसावा दिला.
२३
पुष्कळ जणांनी यरुशलेमकडे याहवेहसाठी अर्पणे आणली आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह याच्यासाठी मौल्यवान भेटवस्तू आणल्या. तेव्हापासून तो सर्व राष्ट्रांद्वारे अत्यंत आदरणीय मानला गेला.
Settings