Skip to content
2 इतिहास २०:६-९

2 इतिहास २०:६-९

६
आणि म्हणाला: “याहवेह, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा, तुम्ही स्वर्गातील परमेश्वर नाही का? तुम्ही राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर राज्य करता. सत्ता आणि सामर्थ्य तुमच्या हातात आहे, आणि कोणीही तुमचा सामना करू शकत नाही.
७
आमच्या परमेश्वरा, या प्रदेशातील रहिवाशांना तुम्ही तुमच्या इस्राएली लोकांपुढून घालवून दिले आणि तो प्रदेश तुमचे मित्र अब्राहामच्या वंशजांना कायमचा दिला नाही का?
८
त्यांनी या प्रदेशात वास्तव्य केले आहे आणि त्यामध्ये तुमच्या नामासाठी पवित्रस्थान बांधले आहे, ते म्हणाले,
९
‘जर आमच्यावर संकटे आली, मग ती न्यायाची तलवार असो किंवा मरी असो किंवा दुष्काळ, तर आम्ही तुमच्या उपस्थितीत तुमचे नाव धारण करणाऱ्या या मंदिरापुढे उभे राहू आणि आमच्या संकटात तुमचा धावा करू आणि तुम्ही आमचे ऐकाल आणि आम्हाला वाचवाल.’
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options