Skip to content
2 इतिहास २०:२६-३०

2 इतिहास २०:२६-३०

२६
चौथ्या दिवशी ते बेराखाह खोऱ्यात एकत्र जमले, जिथे त्यांनी याहवेहला धन्यवाद दिला. म्हणून आजही त्या ठिकाणाला बेराखाहचे खोरे असे म्हणतात.
२७
नंतर यहोशाफाटच्या नेतृत्वाखाली, यहूदीया आणि यरुशलेम येथील सर्व पुरुष आनंदाने यरुशलेमकडे परतले, कारण याहवेहनी त्यांना त्यांच्या शत्रूवर आनंद करण्याचे कारण दिले होते.
२८
त्यांनी यरुशलेममध्ये प्रवेश केला आणि वीणा आणि कर्णे बरोबर घेऊन ते याहवेहच्या मंदिरात गेले.
२९
इस्राएलच्या शत्रूविरुद्ध याहवेहनी कसे युद्ध केले, हे ऐकून आजूबाजूच्या सर्व राज्यात परमेश्वराचे भय निर्माण झाले.
३०
आणि यहोशाफाटच्या राज्यात शांतता होती, कारण त्याच्या परमेश्वराने त्याला सर्व बाजूंनी विसावा दिला होता.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options