2 इतिहास २:११-१२
११
सोरचा राजा हीरामाने शलोमोन राजाच्या पत्रास असे उत्तर पाठविले: “कारण याहवेह आपल्या लोकांवर प्रेम करतात, त्यामुळेच त्यांनी तुम्हाला त्यांचा राजा केले आहे.”
१२
हीराम पुढे हे देखील म्हणाला, “इस्राएलचे परमेश्वर याहवेह धन्यवादित असो, ज्यांनी स्वर्ग आणि पृथ्वी उत्पन्न केली! त्यांनी दावीद राजाला तुमच्यासारखा सुज्ञ, बुद्धिमान व समजूतदार पुत्र दिला, जो याहवेहचे मंदिर व स्वतःसाठी राजवाडा बांधेल.
Settings