Skip to content
2 इतिहास १३:१४-१८

2 इतिहास १३:१४-१८

१४
यहूदीयांनी सभोवार पाहिले, तेव्हा आपण मागे व पुढे वेढले गेलो आहोत असे त्यांना दिसून आले, तेव्हा त्यांनी मदतीकरिता याहवेहचा धावा केला आणि याजक रणशिंग वाजवू लागले.
१५
जेव्हा यहूदी लोकांनी रणगर्जना केली, तेव्हा परमेश्वराने यरोबोअम आणि संपूर्ण इस्राएली सैन्याचा अबीयाह आणि यहूदीयासमोर नायनाट केला.
१६
इस्राएली लोक यहूदीयांसमोरून पळून गेले आणि परमेश्वराने त्यांना त्यांच्या हाती दिले.
१७
अबीयाह आणि त्याच्या सैन्याने त्यांचे इतके मोठे नुकसान केले की, इस्राएलच्या सक्षम लोकांमधील पाच लाख लोक मारले गेले.
१८
त्या प्रसंगी इस्राएल लोकांचा पराभव झाला आणि यहूदीयाचे लोक विजयी झाले, कारण ते याहवेह, त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर यांच्यावर विसंबून राहिले होते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options