Skip to content
2 इतिहास १०:१-५

2 इतिहास १०:१-५

रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले होते.
जेव्हा नेबाटाचा पुत्र यरोबोअमने हे ऐकले (तो अजूनही इजिप्त देशातच होता तिथे तो शलोमोन राजापासून पळून गेला होता), तो इजिप्तवरून परत आला होता.
तेव्हा त्यांनी यरोबोअमला बोलावून घेतले, मग तो आणि संपूर्ण इस्राएल रेहोबोअमकडे गेले व त्याला म्हणाले:
“तुमच्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले होते, तर आता मजुरीचा हा कठीण भार व हे भारी जू तुम्ही हलके करावे, म्हणजे आम्ही तुमची सेवा करू.”
रेहोबोअमने उत्तर दिले, “माघारी जा आणि तीन दिवसांनी परत माझ्याकडे या.” तेव्हा लोक माघारी गेले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options