1 तीमथ्य ५:५
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ५ दाखवत आहे.
२
वयस्कर स्त्रियांना मातेसमान वागणूक दे आणि तरूणींविषयी केवळ शुद्ध भावना बाळगून त्यांना बहिणींसमान वागणूक दे.
३
ज्या गरजवंत विधवा आहेत, त्यांचा सन्मान कर.
४
परंतु विधवेला मुले अथवा नातवंडे असतील, तर त्यांनी प्रथम आपल्या कुटुंबीयांशी सुभक्तीने वागून व आपल्या पितरांचे उपकार फेडण्यास शिकावे, यामुळे परमेश्वराला अतिशय संतोष होतो.
५
जी वास्तविक विधवा आहे व एकटी पडलेली आहे, तिने परमेश्वरावर आपली आशा ठेवली आहे आणि ती मदतीसाठी रात्रंदिवस विनंत्या व प्रार्थना करीत असते.
६
परंतु जी विधवा विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे.
७
त्यांनी निर्दोष असावे म्हणून या गोष्टी निक्षून सांग.
८
परंतु जर कोणी आपल्या स्वकीयांचे आणि विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे आणि तो अविश्वासणार्यापेक्षा वाईट आहे.
Settings