Skip to content
1 तीमथ्य ५:१२

1 तीमथ्य ५:१२

आजूबाजूच्या संदर्भासह वचन १२ दाखवत आहे.
९
जी विधवा साठ वर्षांपेक्षा अधिक आहे, तिच्या पतीबरोबर विश्वासू राहिलेली आहे,
१०
जिच्या चांगल्या कामाबद्दल ती प्रसिद्ध आहे, म्हणजे जिने आपल्या मुलाबाळांचे चांगले संगोपन केले असेल, जिने आतिथी सत्कार केलेला असेल, जिने प्रभूच्या लोकांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांना मदत केली असेल आणि सर्वप्रकारच्या चांगल्या कामासाठी समर्पित केले असेल, तिचे नाव विधवांच्या यादीत लिहावे.
११
परंतु तरुण विधवांचे नाव अशा यादीत नोंदवू नये, कारण जेव्हा त्यांची विषयवासना ख्रिस्तावरील त्यांच्या निष्ठेपेक्षा प्रबळ होते, तेव्हा त्या विवाह करू पाहतात,
१२
आणि म्हणून आपली पहिली प्रतिज्ञा मोडल्याबद्दल त्या आपल्यावर दंड ओढवून घेतात.
१३
शिवाय, त्या आळशी बनण्यात व घरोघर फिरून गप्पागोष्टी करण्यात आणि इतर लोकांच्या कामकाजात लुडबुड करण्यात आपला वेळ घालविण्याची शक्यता आहे.
१४
म्हणून माझी इच्छा आहे की तरुण विधवांनी विवाह करावा, मुलांना जन्म द्यावा व कुटुंब चालवावे; विरोध करणार्‍याला निंदा करण्याचे कोणतेही निमित्त सापडू नये.
१५
कारण असे करून काही विधवा यापूर्वीच मागे फिरून सैतानाच्या मागे गेल्या आहेत.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options