Skip to content
1 तीमथ्य ४:९-१६

1 तीमथ्य ४:९-१६

९
ही गोष्ट विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारावयास योग्य आहे.
१०
याचकरिता आम्ही श्रम व कसून प्रयत्न करतो, म्हणून आमची आशा जो सर्व मानवांचा आणि विशेषतः त्यांच्यावर विश्वास ठेवणार्‍यांचा तारणारा आहे, त्या जिवंत परमेश्वरावर आहे.
११
या गोष्टी आज्ञारूपाने सांग व शिकव.
१२
कोणालाही तुझे तरुणपण तुच्छ लेखू देऊ नकोस. तर तू विश्वासणार्‍यांसाठी बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, विश्वासात, शुद्धपणात कित्ता हो.
१३
मी तिथे येईपर्यंत सार्वजनिक शास्त्रवाचन करण्यात, बोध करण्यात, शिक्षण देण्यात तत्पर राहा.
१४
मंडळीच्या वडिलांनी तुझ्यावर हात ठेवले असता, संदेशाद्वारे जी आध्यात्मिक कृपादाने तुला दिली, त्याची उपेक्षा करू नको.
१५
तुझी प्रगती सर्वांच्या लक्षात येईल म्हणून या गोष्टींचे चिंतन कर, यामध्ये तत्पर राहा.
१६
तू आपले जीवन आणि शिक्षण यावर नीट लक्ष ठेव. या गोष्टींमध्ये टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणार्‍यांचेही तारण करशील.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options