Skip to content
1 शमुवेल ६:१३-१९

1 शमुवेल ६:१३-१९

१३
यावेळेस बेथ-शेमेशचे लोक खोर्‍यात त्यांच्या गव्हाची कापणी करीत होते आणि जेव्हा त्यांनी आपली नजर वर केली आणि कोश पाहिला, तेव्हा तो पाहताच त्यांना आनंद झाला.
१४
ती गाडी बेथ-शेमेश येथील यहोशुआच्या शेतात आली आणि तिथे ती एका मोठ्या खडकाजवळ जाऊन थांबली. लोकांनी त्या गाडीच्या लाकडाचे तुकडे केले आणि याहवेहसाठी होमार्पण म्हणून त्या गाईंचा यज्ञ केला.
१५
लेवी लोकांनी याहवेहचा कोश व त्याबरोबरच्या त्या सोन्याच्या वस्तू ठेवलेली पेटी खाली उतरवून घेतल्या व त्यांनी त्या मोठ्या खडकावर ठेवल्या. त्या दिवशी बेथ-शेमेशच्या लोकांनी याहवेहसाठी होमार्पणे आणि यज्ञ केले.
१६
पलिष्टी लोकांच्या त्या पाच पुढार्‍यांनी हे सर्व पाहिले आणि त्याच दिवशी ते एक्रोनकडे परतले.
१७
पलिष्ट्यांनी याहवेहला दोषार्पण म्हणून ज्या गाठीच्या सोन्याच्या प्रतिमा पाठविल्या त्या या: अश्दोद, गाझा, अष्कलोन, गथ आणि एक्रोन यांच्याकरिता प्रत्येकी एक अशा होत्या.
१८
आणि सोन्याच्या उंदरांच्या प्रतिमांची संख्या त्या पाच पुढार्‍यांच्या मालकीचे असलेले पलिष्टी नगरे; तटबंदीची नगरे व त्यांच्या गावांच्या संख्येनुसार होती. बेथ-शेमेशमधील यहोशुआच्या शेतात ज्या मोठ्या खडकावर लेवी लोकांनी याहवेहचा कोश ठेवला तो आजपर्यंत साक्ष म्हणून आहे.
१९
परंतु परमेश्वराने बेथ-शेमेशमधील काही रहिवाशांवर प्रहार केला व सत्तर लोकांना मारून टाकले, कारण त्यांनी याहवेहच्या कोशात डोकावून पाहिले. आणि याहवेहने त्यांना मोठ्या दंडाने मारले म्हणून लोकांनी शोक केला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options