1 शमुवेल १८:१-५
१
दावीदाने शौलाशी आपले संभाषण संपविले, तेव्हा योनाथानचा जीव दावीदाशी जडला आणि जशी स्वतःवर तशी प्रीती त्याने दावीदावर केली.
२
त्या दिवसापासून शौलाने दावीदाला आपल्याजवळ ठेवले व त्याला त्याच्या पित्याच्या घरी जाऊ दिले नाही.
३
आणि योनाथानने दावीदाशी करार केला, कारण त्याने जशी आपल्या स्वतःच्या जिवावर तशी दावीदावर प्रीती केली.
४
योनाथानने आपल्या अंगातील झगा काढून तो दावीदाला दिला. आपला अंगरखा, तलवार, धनुष्य व कंबरपट्टा सुद्धा दावीदाला दिले.
५
शौलाने दावीदाला कोणत्याही कामगिरीवर पाठविले तरी त्यात दावीद यशस्वी होत असे, म्हणून शौलाने त्याला आपल्या सैन्यात उच्च हुद्दा दिला. ते सर्व सैनिकांना व शौलाच्या अधिकार्यांनाही आवडले.
Settings