1 शमुवेल १४:२४-३०
२४
त्या दिवशी इस्राएल कष्टात होते, कारण शौलाने लोकांना असे म्हणत शपथबद्ध केले होते, “दिवस मावळण्यापूर्वी व मी माझ्या शत्रूंवर सूड घेईपर्यंत, जो कोणी भोजन करेल तो शापित होईल!” त्यामुळे सैन्यातील कोणीही अन्न चाखले नाही.
२५
सर्व सैन्य जेव्हा रानात गेले, त्यावेळी जमिनीवर मध पडलेले होते.
२६
जेव्हा ते आत जंगलात गेले, तेव्हा त्यांनी मध वाहत असलेले पाहिले; परंतु कोणीही आपला हात तोंडाला लावला नाही, कारण त्यांना शपथेचे भय होते.
२७
परंतु आपल्या पित्याने लोकांना शपथबद्ध केले आहे याविषयी योनाथानला माहीत नव्हते, म्हणून त्याने त्याच्या हातात असलेल्या काठीचे टोक मधाच्या पोळ्यात घातले व ते खाल्ले आणि त्याचे डोळे टवटवीत झाले.
२८
नंतर त्याला एका सैनिकाने सांगितले, “तुझ्या पित्याने सैन्याला सक्त शपथेने बद्ध केले की ‘आज जो कोणी भोजन करेल तो शापित होईल!’ म्हणूनच लोक खूप थकून गेले आहेत.”
२९
योनाथान म्हणाला, “माझ्या पित्याने देशावर कष्ट आणले आहे. हे थोडे मध चाखून माझे डोळे पाहा किती टवटवीत झाले आहेत.
३०
आपल्या शत्रूकडून मिळालेल्या लुटीतील लोकांनी काही खाल्ले तर किती बरे असते. पलिष्ट्यांचा संहार केल्याचा आनंद यापेक्षा मोठा असता काय?”
Settings