Skip to content
1 शमुवेल १२:२०-२५

शमुवेलाचे अंतिम आवाहन आणि अभिवचन

1 शमुवेल १२:२०-२५
२०
“भिऊ नका,” शमुवेलने उत्तर दिले. “तुम्ही हे सर्व वाईट केले आहे; तरी आता याहवेहपासून दूर वळू नका, परंतु तुमच्या सर्व हृदयाने याहवेहची सेवा करा.
२१
निरुपयोगी मूर्तीच्या मागे लागू नका. ते तुमचे काहीही भले करू शकत नाहीत किंवा ते तुम्हाला वाचवूही शकत नाहीत, कारण त्या निरुपयोगी आहेत.
२२
आपल्या महान नामाकरिता याहवेह आपल्या लोकांचा धिक्कार करणार नाहीत, कारण तुम्हाला स्वतःचे लोक बनविणे हे याहवेहला बरे वाटले.
२३
माझ्याविषयी म्हणाल, तर मी तुम्हासाठी प्रार्थना करण्याचे सोडून देण्याने मी याहवेहविरुद्ध पाप करावे हे माझ्यापासून दूरच असो. आणि मी तुम्हाला चांगला व खरा मार्ग शिकवेन.
२४
परंतु याहवेहचे भय धरून प्रामाणिकपणे तुमच्या सर्व हृदयाने त्यांची सेवा करण्याविषयी खात्री बाळगा; त्यांनी तुम्हासाठी जी महान कृत्ये केली आहेत ती लक्षात ठेवा.
२५
परंतु तुम्ही पाप करीत राहाल, तर तुम्ही आणि तुमचा राजा नाश पावाल.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options