Skip to content
1 शमुवेल १२:१६-१९

1 शमुवेल १२:१६-१९

१६
“तर आता, शांत उभे राहा आणि याहवेह तुमच्या नजरेसमोर जे महान कृत्य करणार आहेत ते पाहा!
१७
हा गव्हाचा हंगाम नाही काय? मी आता याहवेहकडे मेघगर्जना आणि पाऊस पाठवावा म्हणून प्रार्थना करेन. आणि तुम्हाला समजून येईल की, तुम्ही आपणासाठी राजा मागून याहवेहच्या दृष्टीने किती वाईट गोष्ट केली आहे.”
१८
तेव्हा शमुवेलने याहवेहकडे प्रार्थना केली आणि त्याच दिवशी याहवेहने मेघगर्जना व पाऊस पाठवला. तेव्हा सर्व लोकांनी याहवेहचे आणि शमुवेलचे भय धरले.
१९
सर्व लोक शमुवेलला म्हणाले, “याहवेह तुमचे परमेश्वर यांच्याकडे तुमच्या सेवकांसाठी प्रार्थना करा म्हणजे आम्ही मरणार नाही, कारण राजाची मागणी करून आम्ही आमच्या इतर सर्व पापांमध्ये भर घातली आहे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options