Skip to content
1 पेत्र ४:१३

1 पेत्र ४:१३

आजूबाजूच्या संदर्भासह वचन १३ दाखवत आहे.
१०
परमेश्वराच्या कृपेच्या वेगवेगळ्या रूपामध्ये परमेश्वराचे एकनिष्ठ कारभारी म्हणून तुमच्यातील प्रत्येकाने एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्हाला जे काही विशेष कर्तृत्वदान मिळाले आहे त्याचा उपयोग करा.
११
जर कोणी संदेश देतो तर त्याने असा संदेश द्यावा की, तो परमेश्वराचेच शब्द बोलत आहे. जर कोणी सेवा करतात, तर परमेश्वर जशी शक्ती पुरवितात त्याप्रमाणे करावी, म्हणजे सर्व गोष्टीमध्ये येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराचे गौरव होईल. त्यांना गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ असो. आमेन!
१२
प्रिय मित्रांनो, तुमची परीक्षा घेण्यासाठी तुमच्यावर आलेल्या अग्नीसारख्या वाईट अनुभवांबद्दल आश्चर्यचकित होऊ नका, जसे की तुमच्यासाठी काहीतरी विचित्रच घडत आहे.
१३
परंतु ख्रिस्ताच्या दुःखात जेवढे तुम्हाला सहभागी होता येईल तेवढे होऊन आनंद करा, म्हणजे ज्यावेळी त्यांचे गौरव प्रकट होईल त्यावेळी तुम्ही अतिआनंदीत व्हाल.
१४
जर ख्रिस्ताच्या नावामुळे तुमचा अपमान झाला असेल तर तुम्ही धन्य, कारण गौरवाचा आत्मा म्हणजेच परमेश्वराचा आत्मा तुम्हावर येऊन स्थिरावला आहे.
१५
जर तुम्ही दुःख भोगता तर खुनी किंवा चोर, किंवा कोणताही गुन्हेगार किंवा लुडबुड्या म्हणून सुद्धा दुःख भोगू नये.
१६
तरीपण ख्रिस्ती या नात्याने तुम्ही दुःख सहन केले तर लाज मानू नका, तर परमेश्वराची स्तुती करा की तुम्ही ते नाव धारण केले आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options